शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
2
आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
3
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
4
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 
5
आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल
6
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या
7
LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब
8
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
9
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल
10
मला वाटते ५ वेळच्या नमाजपेक्षा...; फराह खानने प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला दिले असे उत्तर...
11
विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
12
अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
13
“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ
14
बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!
15
"मी माझ्या आईची हत्या..."; कोलकात्यात तरुणाने आईला चाकूने मारले, मृतदेहासोबत रात्र घालवली; चहा विक्रेत्यासमोर गुन्हा कबूल केला
16
लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'
17
उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ...
18
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर गोंधळ घालू लागले; ग्राहक वीज मंडळाचे उंबरे झिजवू लागले
19
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली
20
नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी

गोल्फच्या मैदानातून उडालेला चेंडू दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला; गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 09:17 IST

गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ असून यापूर्वीही असाच प्रकार घडला होता

किरण शिंदे

पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब  कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळला. त्यानंतर हाच चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवरही आदळला. अचानक आलेल्या या चेंडूने उड्डाणपुलावर एकच तारांबळ उडाली होती. या घटनेनंतर संबंधित तरुणांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. प्रणील अनिल कुसळे (वय ३५, रा. येरवडा, पुणे) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रणील आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी दुचाकीने येरवडा परिसरातील गुंजन चौकातून जेल रस्त्याकडे निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी उड्डाणपूलावर आली असताना गोल्फ क्लबच्या मैदानातून आलेला पांढऱ्या रंगाचा चेंडू प्रणीलच्या छातीवर आदळला. त्यानंतर हाच चेंडू उड्डाण पुलावरील इतर वाहनांवरही जाऊन आदळला. या घटनेनंतर प्रणिल यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. तक्रार अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी येरवडा पोलिसांनी याप्रकरणी  गोफ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दीड वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. गोल्फ क्लब मैदानातून आलेला एक चेंडू दुचाकी स्वाराच्या तोंडावर आदळला होता. तेव्हाही येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा घडल्याने येथील सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाSocialसामाजिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्यbikeबाईक