बेकरीतील माल कमी किमतीत विकत असल्याने एकास मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:22 IST2024-12-27T18:21:48+5:302024-12-27T18:22:07+5:30

बेकरीमधील पदार्थ ऑफरमध्ये विकले. याचा संशयित आरोपींना राग आला.

A bakery worker was beaten up for selling goods at a low price | बेकरीतील माल कमी किमतीत विकत असल्याने एकास मारहाण  

बेकरीतील माल कमी किमतीत विकत असल्याने एकास मारहाण  

पिंपरी : बेकरीतील माल कमी किमतीमध्ये विकत असल्याच्या रागातून बेकरी चालकाला १० ते १५ जणांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी सव्वाएक वाजता काळेवाडी येथे घडली. अकील निजामुद्दीन अन्सारी (वय ३०, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार असिफ हनीफ उस्मानी (३५), इम्रान हनीफ उस्मानी (३८), सलमान हनीफ उस्मानी (३०, तिघे रा. काळेवाडी), ताजुद्दीन निजामुद्दीन अन्सारी (४७, रा. भोसरी), इरफान शकूर अन्सारी (४८, रा. थेरगाव) आणि इतर आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची काळेवाडी येथील पाचपीर चौकात एसएमएस जर्मन बेकरी आहे. त्यांनी त्यांच्या बेकरीमधील पदार्थ ऑफरमध्ये विकले. याचा संशयित आरोपींना राग आला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी अकील अन्सारी आणि भाऊ जियाउर अन्सारी यांना बेदम मारहाण केली. काळेवाडी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: A bakery worker was beaten up for selling goods at a low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.