६५ वर्षीय पतीच्या त्रासाला कंटाळून ५९ वर्षाच्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल

By विवेक भुसे | Updated: May 21, 2023 16:07 IST2023-05-21T16:06:40+5:302023-05-21T16:07:04+5:30

पती पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने मारहाण करत असे

A 59-year-old woman took an extreme step after suffering from her 65-year-old husband | ६५ वर्षीय पतीच्या त्रासाला कंटाळून ५९ वर्षाच्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल

६५ वर्षीय पतीच्या त्रासाला कंटाळून ५९ वर्षाच्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल

पुणे: त्यांच्या मुलीचे लग्न झाले. वयाची साठी आली तरी पती चारित्र्याचा संशय घेत होता. या छळाला कंटाळून एका ५९ वर्षाच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिता हिवराळे (वय ५९, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत त्यांच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नागनाथ हिरा हिवराळे (वय ६५, रा. गोंधळेनगर, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गोंधळेनगरमध्ये १७ मे रोजी सकाळी घडली होती.

याबात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची आई अनिता हिवराळे या एका दुकानात काम करत होत्या. तर, त्यांचे वडिल नागनाथ हा मोलमजुरी करतो. फिर्यादी यांचा विवाह झाला आहे. नागनाथ हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने मारहाण करीत असे. शारीरीक व मानसिक छळ करीत होता. या छळाला कंटाळून अनिता यांनी १७ मे रोजी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आईचा अंत्यविधी केल्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांच्या मुलीने तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

Web Title: A 59-year-old woman took an extreme step after suffering from her 65-year-old husband