पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:45 PM2023-11-10T12:45:57+5:302023-11-10T12:46:12+5:30

राम मंदिरासह अयाेध्येत इतर विकासकामे करण्यासाठी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध कंपन्या उत्सुक

A 33 thousand feet passenger reception center will be built in Ayedhya by Udyajka in Pune | पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र

पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिरासह अयाेध्येत इतर विकासकामे करण्यासाठी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध कंपन्या उत्सुक आहेत. त्याचबराेबर श्रीराम चरणी आपली सेवा पाेहाेचावी, या उद्देशाने देशातील अनेक उद्याेजक इच्छुक आहेत. त्यापैकी एक असलेले पुण्यातील उद्याेजक श्रीधर गायकवाड यांना अयाेध्येतील ‘यात्री स्वागत केंद्र’ उभारण्याचा बहुमान मिळाला आहे.

श्रीराम मंदिराचे उद्घाटन येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जगभरातून १३० देशांचे प्रतिनिधी, साधुसंत अयोध्येत येणार आहेत. यासाठी सध्या अयोध्येत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यातील श्री राम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘यात्री स्वागत कक्ष’ उभारणी करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. जे पुण्यातील ‘श्रीधर फॅब्रिकेशन’च्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे.

असे आहे यात्री स्वागत कक्ष

- या यात्री स्वागत कक्षाचा विस्तार ३३ हजार स्क्वेअर मीटर इतका आहे.
- यामध्ये यात्रेकरूंसाठी दवाखाना, नोंदणी कक्ष, आराम कक्ष, लॉकर रूम आदी गोष्टींचा समावेश असणार आहे.

Web Title: A 33 thousand feet passenger reception center will be built in Ayedhya by Udyajka in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.