Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...

Wriddhiman Saha BMW Car : वृद्धिमान साहाने BMW ची X7 कार खरेदी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 07:10 AM2024-06-14T07:10:45+5:302024-06-14T07:14:58+5:30

whatsapp join usJoin us
indian cricket team player Wriddhiman Saha purchase new BMW Car | Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...

Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Wriddhiman Saha New Car : सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या वृद्धिमान साहाची कसोटी कारकिर्द चांगली राहिली. मात्र, त्याला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. किंबहुना त्याला जास्त संधी मिळाली नाही. केवळ आयपीएलमध्ये दिसणाऱ्या साहाने आता त्याचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. लहानपणी पाहिलेले ते स्वप्न म्हणजे आलिशान गाडी खरेदी करणे. आता साहाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नव्या कोऱ्या गाडीची झलक शेअर केली आहे. यासोबत त्याने एक भावनिक विधान केले आहे.

खरे तर वृद्धिमान साहाने BMW ची X7 कार खरेदी केली आहे. त्याची किंमत १ कोटींहून अधिक आहे. अनेक क्रिकेटपटूंकडे ही कार आहे. साहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते की, तो कारसोबत उभा आहे. साहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी वयाच्या १२ व्या वर्षापासून स्वप्न पाहत होतो, आता जेव्हा माझे करिअर संपुष्टात आले तेव्हा मी बीएमडब्ल्यू कार घरी आणली. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनिक क्षण आहे.

दरम्यान, वृद्धिमान साहाने २०१० मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले असून, १३५३ धावा केल्या आहेत. साहाने कसोटी कारकिर्दीत ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहे. त्याने ९ वन डे सामने खेळले आहेत. पण त्याला या फॉरमॅटमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलमध्ये १७० सामने खेळलेल्या साहाने २९३४ धावा कुटल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १ शतक आणि १३ अर्धशतकांची नोंद आहे. तो सध्या गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग आहे. 

भारतीय शिलेदाराने BMW ची X7 कार खरेदी केली आहे. याचे मायलेज ११.२९ ते १४.३१ किलोमीटर प्रति लिटर एवढे आहे. या कारचे इंजिन सुमारे ३ हजार सीसी आहे. ही कार खूप हायटेक असून, यात ३६० डिग्री कॅमेरा सेटअप आहे. 

Web Title: indian cricket team player Wriddhiman Saha purchase new BMW Car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.