किरकोळ वादातून १७ वर्षीय विवाहित मुलीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:30 IST2022-10-28T16:30:05+5:302022-10-28T16:30:18+5:30

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा त्याने तिला पळवून नेले

A 17 year old married girl was killed over a petty dispute | किरकोळ वादातून १७ वर्षीय विवाहित मुलीचा खून

किरकोळ वादातून १७ वर्षीय विवाहित मुलीचा खून

पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा त्याने तिला पळवून नेले. तिच्याशी लग्न केले. मात्र, किरकोळ वाद झाले अन त्याने तिचा गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी तरुणास विमानतळ पोलिसांनीअटक केली. संजना उदय मकदूम (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन युवतीचे नाव आहे. 

या प्रकरणी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. संजनाच्या आईने या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चेतनला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चेतन आणि संजना यांची ओळख होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक नोव्हेंबर २०१८ रोजी पळवून नेले होते. याबाबत संजनाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी चेतनला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालायाने त्याला नुकताच जामीन मंजूर केला होता. त्यानंतर चेतनने संजनाला पुन्हा पळवून नेले. तिच्याशी विवाह केला. दोघे जण लोहगावमधील निंबाळकरनगर परिसरात राहत होते. चेतनने संजनाचा छळ सुरू केला. दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्याने संजनाला बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केला. सहायक पोलीस निरीक्षक रत्ना सपकाळे तपास करत आहेत.

Web Title: A 17 year old married girl was killed over a petty dispute