पुणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून धडक मोहीम राबवण्यात आली. २ ते ४ जानेवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहीमेत
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २३२ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या ७२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातील १२१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. नियमांचे काटेकोर पालन केल्यास शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध राहू शकते, असे पुणे शहर वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व वाहनचालकांनी मोटार वाहन अधिनियमातील नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले.
Web Summary : Pune police fined 232 drunk drivers and 720 triple riders in three days. 121 motorcycles were seized. Police urge citizens to follow traffic rules for safety.
Web Summary : पुणे पुलिस ने तीन दिनों में 232 नशे में गाड़ी चलाने वालों और 720 ट्रिपल सवारी करने वालों पर जुर्माना लगाया। 121 मोटरसाइकिलें जब्त की गईं। पुलिस ने नागरिकों से सुरक्षा के लिए यातायात नियमों का पालन करने का आग्रह किया।