शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी : वरूण गांधी यांची स्पष्टोक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 18:56 IST

ग्रामीण आणि शहरी भागांतील दरी वाढत असल्याचे तथ्य वरूण गांधी यांनी आकडेवारीनिशी उलगडून दाखविले.

ठळक मुद्दे१०० टक्के गरीब उमेदवारांचे डिपॉझिट जप्त जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहचवायची असेल तर शासनाला धोरणात्मक सुधारणा गरजेची शहरांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध होत नाहीखेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास देशाचा विकास अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ८४ टक्के श्रीमंत उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर ज्या उमेदवारांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती त्या १०० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले अशी स्पष्टोक्ती भाजपाचे नेते, खासदार वरूण गांधी यांनी शुक्रवारी केली. वरूण गांधी यांनी लिहलेल्या ‘अ रूरल मॅनिफेस्टो, रिलायझिंग इंडियास फ्युचर थ्रू हर व्हिलेज’ या पुस्तकाचे प्रकाशन सिंम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, डॉ.ज्योती चंद्रमणी उपस्थित होते. ग्रामीण आणि शहरी भागांतील दरी वाढत असल्याचे तथ्य वरूण गांधी यांनी आकडेवारीनिशी उलगडून दाखविले. गांधी म्हणाले, ‘देशातील आयएएस अधिकाऱ्यांचा अभ्यास केला असता त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के आयएएस अधिकारी हे देशातील प्रमुख २० शहरांमधून आल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ७९ टक्के आयएएस अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांमधून शिक्षण घेतले आहे. आयआयटी, आयआयएममध्ये देशातील मागास १०० जिल्हयांमधून किती विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आले याची माहिती घेतल्यास विदारक चित्र समोर येईल. शहरांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते मागे पडत आहेत. सगळयाच क्षेत्रात मोठयाप्रमाणात असमानतेचे चित्र दिसून येत आहे.’देशातील मोठया संख्येने असलेल्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहचवायची असेल तर शासनाला धोरणात्मक सुधारणा कराव्या लागतील. विदर्भात जलसिंचनाच्या सुविधा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या, त्याचे परिणाम शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागण्याइतपत भयावह दिसून आले. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घ्यावी लागेल असे गांधी यांनी सांगितले.डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास देशाचा विकास शक्य नाही. देशात ६ लाख खेडी आहेत, या खेडयांमध्ये शहराप्रमाणे सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे शहरे स्मार्ट करण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत, त्याप्रमाणे खेडी स्मार्ट करण्यासाठी शासनाने योजना राबवाव्यात.’डॉ. रजनी गुप्ते यांनी प्रास्ताविक केले.....महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व ठाणे ही तीन शहरे सर्वाधिक पाण्याचा वापर करतात. काही वर्षांपूर्वी लातूरला ट्रेनने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली होती. त्याचवेळी शहरांमध्ये स्विमिंग टँक बांधण्याचा सपाटा सुरू आहे. शहर आणि खेडयांमधील हा विरोधाभास दूर होण्याची गरज असल्याचे मत वरूण गांधी यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :PuneपुणेVarun Gandhiवरूण गांधीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाGovernmentसरकार