शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातील धरणात ८१.१५ टक्के पाणी

By admin | Updated: September 25, 2016 04:51 IST

जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के

घोडेगाव : जिल्ह्याबरोबर अहमदनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांतील तहान भागविणाऱ्या कुकडी प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात अवघा ४९.२२ टक्के पाणीसाठा होता. या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे थोडीफार कमी झालेली पाण्याची पातळी भरून निघाल्याने या वर्षी आशादायी वातावरण आहे.कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नूर यांच्याशी सध्याचा पाणीसाठा व नियोजन याबाबत चर्चा केली असता, कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याने धरणात उत्तम साठा झाला आहे. मात्र, कुकडी प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पूर्व भागात अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. येथील तलाव अजूनही भरलेले नाहीत. याच पूर्व भागात पाण्याची मागणी सर्वांत जास्त असते. त्यामुळे कुकडी प्रकल्प जरी भरलेला असला, तरी मागणीही विस्तृत आहे. याचा पाण्यावर ताण येणार आहे. मागील वर्षी ५० टक्के पाणीसाठा असताना चांगले नियोजन करून लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. त्याप्रमाणे याही वर्षी उत्तम नियोजन करून शेवटच्या माणसापर्यंत पाणी देण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत. या वर्षी सर्वांत मोठे आव्हान हे नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्याचे आहे. मागील तीन ते चार वर्षांचा विचार करता आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीचे मोठे पाउस पडले आहेत. (वार्ताहर)- कुकडी प्रकल्पातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या डिंभे धरणात १०० टक्के, तर जुन्नर तालुक्यातील वडज धरणात ९९.४२ टक्के, पिंपळगाव जोगा धरणात ८२.६० टक्के, माणिकडोह धरणात ७०.२३ टक्के साठा झाला आहे. तर, यडगाव साठवण धरणात २५.३० टक्के पाणी आहे. तसेच, शिरूर तालुक्यातील घोड धरणात ९६.६७ टक्के, चिल्हेवाडी धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.