शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दोन दिवसांत 8 हजार 100 रेमडेसिविर इंजेक्शनचे 540 खासगी हाॅस्पिटल्सना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांत 8 हजार 100 रेमडेसिविर इंजेक्शनचा 540 खासगी हाॅस्पिटल्सला वाटप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहर आणि जिल्ह्यात दोन दिवसांत 8 हजार 100 रेमडेसिविर इंजेक्शनचा 540 खासगी हाॅस्पिटल्सला वाटप करण्यात आले. यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पुण्यात गेल्या काही दिवसांत 32 हजार 61 इतकी रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.

संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही-शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यात 11 एप्रिलपासून २४ X ७ रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिविरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याचसोबतच पुणे, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in व https://.pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.