बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

By भाग्यश्री गिलडा | Updated: December 20, 2023 19:50 IST2023-12-20T19:49:22+5:302023-12-20T19:50:05+5:30

आरोपी हा एक वर्षांपूर्वी त्याच बेकरीमध्ये कामाला होता

8 lakhs stolen by breaking the lock of the bakery | बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

पुणे: भवानीपेठ परिसरात असलेल्या बेकरीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत बेकरीमध्ये प्रवेश करत ७ लाख ८० हजार रुपये चोरून नेल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे. याबाबत मोहम्मद युनूस हव्वारी (वय ४२, रा. भवानी पेठ) यांनी मंगळवारी (दि. १९) पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी दानिश हा एक वर्षांपूर्वी फिर्यादींच्या बेकरीमध्ये कामाला होता. त्याने बेकरीमध्ये काम करणाऱ्या आणखी एका मुलाच्या मदतीने बेकरीमध्ये चोरी केली आहे. १४ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास डॅनिश आणि त्याच्या साथीदाराने स्क्रू ड्रायव्हर आणि हॅक्सा ब्लेडच्या मदतीने कुलूप कापून बेकरीचे शटर उचकटून बेकरीमध्ये प्रवेश केला. बेकरीमधील ७ लाख ८० हजार रुपये चोरून नेले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलीसउपनिरीक्षक थोरवे पुढील तपास करत आहेत.

Web Title: 8 lakhs stolen by breaking the lock of the bakery