शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेला दरमहा ६२ लाखांचा ‘जल’दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:00 IST

मंजुर कोट्यापेक्षा तीन ते साडेतीन टीएमसी अधिक वापर

ठळक मुद्देदोन वर्षांत १५ कोटींचा दंडशहराला दररोज ६३५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय अधिकृत पाणीवापरासाठी महापालिका २८.३२ लिटरला मोजते ६० पैसे

विशाल शिर्के - पुणे :जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या कोट्यानुसार महानगरपालिकेचा वापर होत नसल्याने जलसंपदा विभागाने मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरावर जल‘दंड’ उगारला आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिकेला सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच महापालिकेला दरमहा सरासरी, ६२ लाख ३३ हजार ८०६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मापदंडानुसार शहराला दररोज ६३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१७मध्ये दिला आहे. म्हणजेच त्यानुसार वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी होते. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. सध्या महापालिका १३५० ते १४५० एमएलडी पाणी उचलत आहे. म्हणजेच दररोज १३५ ते १४० कोटी लिटर पाण्याचा वापर होत आहे. या दराने वार्षिक १७.५० ते १८.५० टीएमसी पाणी पुणे शहराला लागेल. मंजूर कोट्या पेक्षा अधिक पाणी वापरल्यास जलसंपदा विभाग दंड ठोठावते. म्हणजेच साडेअकरा टीएमसी हा कोटा धरुन दंडाची आकारणी होते. नियमानुसार मंजूर कोट्या पेक्षा १५ टक्के अधिक पाणी वापर झाल्यास दंड आकारला जात नाही. म्हणजेच १३.२२ टीएमसी पाणीवापर दंडाच्या कक्षेबाहेर येतो. मात्र, त्यापुढे १६.१ टीएमसी पर्यंत दीडपट आणि त्या पुढे वापर झाल्यास दुप्पट दंड आकारला जातो. जलसंपदाकडून जुलै ते जून या कालावधीत दर दोन महिन्यांनी महापालिकेला पाणीपट्टी पाठविली जाते. महापालिकेने जुलै ते जून २०१७-१८ या कालावधीत १८.७८ टीएमसी पाण्याचा वापर केला होता. म्हणजेच ५.५६ टीएमसी पाण्यावर दंड आकारण्यात आला. तर, जुलै ते जून २०१८-१९मधे १७.१७ टीएमसी पाणी वापरले. त्यामुळे ३.९५ टीएमसी पाण्यावर दंड आकारण्यात आला आहे. या दोन्ही वर्षांचा मिळून १४ कोटी ९६ लाख ११ हजार ३४४ रुपयांचा दंड पालिकेला ठोठावला आहे. ------------अधिकृत पाणीवापरासाठी महापालिका २८.३२ लिटरला मोजते ६० पैसे

जलसंपदा विभाग महापालिकेला पिण्याच्या अधिकृत पाणी वापरासाठी २८.३२ लिटरमागे (एक घनमीटर) ५० पैसे मोजते. तर, औद्योगिक वापरासाठी ९.६० पैसे प्रति घनमीटक आकारले जातात. जुलै २०१९ पासून त्यात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणेज पिण्याच्या पाण्यासाठी ६० पैसे आणि औद्योगिक पाण्यासाठी ११.५२ पैसे मोजावे लागतील. मंजुर कोट्या पेक्षा जास्त पाणी वापरल्यास या आकाराच्या दीड ते दुप्पट दराने पैसे मोजावे लागतात.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका