शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पुणे विद्यापीठात ५६ वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी! एम ए मराठी विषयासाठी मिळवली ४ सुवर्णपदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 16:53 IST

शिक्षणानंतर बँकेत ३० वर्षे नोकरी केली, वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्तीनंतर एम ए मराठीला प्रवेश घेतला

ठळक मुद्देत्या आता सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम ए मराठीसाठी चक्क ५६ वर्षीय विद्यार्थिनीला चार सुवर्णपदक मिळाली आहेत. कला, साहित्य आणि लिखाण यांची आवड असणाऱ्या पुण्यातील नीलिमा फाटक यांचे सर्वच स्तरावर कौतुक होऊ लागले आहे.

वयाच्या ते ३० वर्षांपर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणात रस दाखवतात. तसेच आवर्जून पद्ययुत्तर पदवीसाठी प्रवेश घेतात. त्यांनतर नोकरी, व्यवसायात गुंतल्यावर पुन्हा शिक्षणाकडे शक्यतो वळत नाहीत. पण फाटक यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर बँकेत ३० वर्ष नोकरी करून एम ए मराठीला प्रवेश घेतला. त्यामध्ये मन लावून अभ्यास करत चार सुवर्णपदक मिळवल्याची उत्तम कामगिरी दाखवली आहे. 

नीलिमा फाटक यांनी रामकृष्ण मोरे आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वकिलीचे शिक्षणही केले. त्यांना आधीपासूनच कविता लेखन, साहित्य वाचनाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्या. पण त्यांनी आपले लिखाण, वाचन , कवितालेखन हे छंद थांबवले नाहीत. कामातून वेळ मिळाला की त्या साहित्यात गुंतून जात असे. कविता लिहिण्याचा छंद कधीही थांबून दिला नाही. अखेर त्याचे फळ म्हणून २०१९ साली 'निलमाधव' नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. जपानमध्ये १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हाच करम व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पारंपरिक व उच्चशिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समाजकार्य म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करत असलेल्या स्नेहवन संस्थेशी या संलग्न आहेत. 

फाटक म्हणाल्या, तीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. त्यानंतर वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली. शालेय जीवनापासूनच मला वाचन आणि कविता लेखनाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनातही मी लिखाण थांबवले नाही. माझी एक कविता मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या मराठी अभ्यासक्रमात आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरीला लागले. पण एम ए मराठी करण्याचे ठरवले होते. नोकरीच्या ३० वर्षांमध्ये मराठी साहित्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. एका बाजूने लिखाणाचे कार्य सातत्याने चालू होते. त्याचेच फळ म्हणून आता मला पुणे विद्यापीठातून चार सुवर्णपदक मिळाली आहेत. माझी पीएचडी करण्याची पण इच्छा आहे. आताच मी सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. विद्यापीठात पीएचडी साठी प्रवेशही घेतला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठWomenमहिला