शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:17 IST

जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली

- अंबादास गवंडी पुणे : शहरासह जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी दूषित असल्याचा मुद्दा समोर आला. परंतु महापालिकेसह आरोग्य विभागाने पाणी शुद्ध असल्याचा दावा केला. परंतु तपासणीत जलशुद्धीकरणामध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले असून, शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले आहे.

जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो असे निष्कर्ष काढण्यात आले. परंतु नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाताे, असा दावा महापालिका आणि आरोग्य विभाग केला होता. परंतु पाण्याचे चार हजारापेक्षा जास्त पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ५५ पाण्याचे नमुने हे पिण्यास अयोग्य आहे, असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) तपासणीत देखील दूषित पाण्यामुळेच रुग्णांना त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाण्याच्या ४६६१ नमुन्यांची तपासणी

आरोग्य विभागाने पुणे शहर आणि सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला, धायरी, नांदेड गाव या परिसरातील आतापर्यंत पाण्याच्या ४६६१ नमुन्यांची तपासणी केली. यामधील ५५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निदान झाले आहे, तर 'एनआयव्ही'च्या तपासणीत काही रुग्णांच्या नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस आणि 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' आढळून आले आहे. नोरोव्हायरस आणि 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' यांचा संसर्ग प्रामुख्याने दूषित पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून होतो, असे शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक