शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

अतिवृष्टीत पुणे जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे 55 कोटींचे नुकसान : सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंदाज  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:28 PM

पुणे जिल्ह्यातील जुन्नर,  आंबेगाव,  खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा अदी तालुक्यांमध्ये मोठे नुकसान...

पुणे : गेल्या आठवड्यात घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील रस्ते आणि लहान मोठे पुल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात तब्बल 260 किलो मीटरचे रस्ते व 190 पुलांना पुराचा फटका बसला असून, तब्बल 55 कोटी 49 लाख रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गुरुवार व शुक्रवार दोन दिवसांत पावसाने अशरक्षः थैमान घातले. जिल्ह्यातील जुन्नर,  आंबेगाव,  खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा अदी तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यात काही ठिकाणी पुल पाण्याखाली गेले तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले.  नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने रस्ते, पुल, मो-या वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते व पुलांना बसला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्राथमिक अहवाल तयार केला असून,  यात तब्बल 260 किलोमीटरचे रस्ते व 190 पुलांचे नुकसान झाले आहे. यात तात्पुरत्या दुरूस्तीसाठी तातडीने साडे सात कोटी तर कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी 48 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. -------जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे मोठे नुकसान गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर,  आंबेगाव,  खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा अदी तालुक्यांमध्ये रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही कामे तातडीने पूर्ण करावी लागणार आहेत. तर पाऊस थांबल्यानंतर कायमस्वरुपी दुरूस्ती करावी लागणार आहे. - अतुल चव्हाण,  अधीक्षक अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग ---------तालुकानिहाय रस्ते व पुलांचे नुकसान तालुका        रस्ते (कि.मी)      पुल मुळशी          29.76              47भोर             117.85             33वेल्हा            34.47              16जुन्नर          27.32               35आंबेगाव       24                    31मावळ          18.35               16खेड              8. 2                 12 एकूण          260.25             190

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी