शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीमुळे ११ दिवसांत पालिकेत ५५ कोटी वसूल

By admin | Updated: April 13, 2017 03:54 IST

आर्थिक वर्षांचे पहिले तीन महिने मिळकत करामध्ये ५ टक्के सवलत मिळत असल्याने मागील ११ दिवसांत महापालिकेत तब्बल ५५ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे.

पुुणे : आर्थिक वर्षांचे पहिले तीन महिने मिळकत करामध्ये ५ टक्के सवलत मिळत असल्याने मागील ११ दिवसांत महापालिकेत तब्बल ५५ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. मागील वर्षी याच काळात ३० कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. सवलत मिळत असल्यामुळे कर जमा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असल्याचे दिसते आहे.मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितल, की सन २०१७-१८ या वर्षात २५ हजारांपेक्षा कमी मिळकत कर असणाऱ्यांना १० टक्के तर २५ हजारांपेक्षा कमी असणाऱ्यांना ५ टक्के सवलत मिळणार आहे. यावेळची मिळकत कराची बिले पाणीपट्टीतील वाढीव १५ टक्के जमा करून पाठवण्यात आली आहेत. ही वाढ मागील वर्षीच २४ तास पाणी योजनेला मान्यता देताना मंजूर करण्यात आली होती. प्रशासनाने अंदाजपत्रकात सुचवलेली मिळकत करातील १२ टक्के करवाढ मात्र स्थायी समितीने रद्द केली आहे. ही वाढ यावर्षी पाठवण्यात आलेल्या बिलांमध्ये जमा करण्यात आली नव्हती. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मंजूरी मिळाली असती तर या वाढीची पुरवणी बिले मिळकतदारांना पाठवण्यात येणार होती. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, मुख्य इमारत आणि विविध बँकामध्ये मिळकत कर भरण्याची सुविधा उपल्ब्ध आहे. मिळकत कर आॅनलाईन पद्धतीने जमा केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. महापालिकेला एलबीटी अनुदानापोटी ८४ कोटीराज्य शासनाच्या वतीने स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अनुदानापोटी पुणे महापालिकेला ८४ कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे महापालिकेची नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली झाली असून, गत वर्षाच्या तुलनेत यामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.एलबीटीच्या उलाढाल मर्यादेत बदल केल्यानंतर महापालिकांना होणारे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. गेल्या आर्थिक वर्षात निवडणुकांमुळे दोन महिन्यांचे सर्वच महापालिकांचे अनुदान थकले होते. मार्चच्या शेवटच्या दोन दिवसांत ही थकित रक्कम शासनाने महापालिकांना वितरित केली.नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यावर एलबीटीचे अनुदान नियमित मिळण्याची अपेक्षा केली जात होती. त्यानुसार शासनाने बुधवारी एलबीटी अनुदानाचा पहिला हप्ता महापालिकांना वितरित करण्याचे आदेश काढले. यामध्ये पुणे महापालिकेला पहिल्या टप्प्यात ८४ कोटी १८ लाख रुपये प्राप्त होणार आहेत. गत वर्षी एलबीटी अनुदानातून ८१ कोटी रुपये मिळत होते. तर जानेवारीच्या अनुदानात कपात करून ६६ कोटीच देण्यात आले होते. त्यामुळे आता नक्की किती अनुदान मिळणार, याकडे महापालिकेचे लक्ष लागले होते. मागील वर्षांच्या तुलनेत यामध्ये वाढ झाल्याने नवीन वर्षाची सुरुवात किमान चांगली झाली आहे.मिळकत करातील 12 टक्केकरवाढ स्थायी समितीने रद्द केली आहे.२५ हजारपेक्षा कमी मिळकत कर असणाऱ्यांना10 टक्केकरवाढ स्थायी समितीने रद्द केली आहे. यापेक्षा कमी असणाऱ्यांना ५ टक्के सवलत मिळणार आहे.