शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:59 IST

गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते.

ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : सहा कंपन्यांसह, १९८ विक्रेत्यांचा परवाना निलंबित १४.५६ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी

पुणे : योग्य दर्जाचे आणि कृषी विभागाने शिफारस कलेल्या प्रमाणे कीटकनाशक उपलब्ध करुन न देणे, नियमाप्रमाणे कीटकनाशकांची साठवणूक न केल्याबद्दल कृषी विभागाने सहा कंपन्यांचे आणि ५३ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले असून, १९८ जणांचे परवाने निलंबीत केले आहेत. याशिवाय १४.५६ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत कीटकनाशके उत्पादन व साठवणुक स्थळांची १२ ते १४ जुलै दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात कीटकनाशके कायदा, १९६८ व कीटकनाशके नियम, १९७१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत  सहा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, २ हजार ३४४ प्रकरणांमध्ये १४.५६ कोटींच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, कीटकनाशकाचा ७ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ जणांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, १८६ जणांवर न्यायालयाद दावा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी ६५ गुणवत्ता नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली होती. ------------------- अशी राबविली मोहीम- राज्यातील ३४२ कीटकनाशके साठवणुक स्थळांची एकाचवेळी तपासणी, ६५२ कीटकनाशकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले- कीटकनाशकांची योग्य साठवणुक व विक्री करीत नसलेल्या १७ केंद्रांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही सुरु-२ हजार ३४४ प्रकरणांत १४.५६ कोटी रुपयांच्या कीटनाशक साठ्यांच्या विक्रीस बंदी, ७.४४ कोटी रुपयांचा साठा जप्त-१९८ विक्रत्यांचे परवाने निलंबित, ५३ जणांचे परवाना केले रद्द - राज्यात ९ प्रकरणांत कीटकनाशकाच्या १२.७५ टन साठ्यास विक्री बंद ----------------------

योग्य कीटनाशकांची माहिती येथे पाहा  पिकांना कोणते कीटनाशक फवारावे याची माहिती mahaagricropsap.gov.inया संकेतस्थळावरील ‘मोबाईल अ‍ॅप न्यू’ मधील ‘क्रॉप क्लिनीकमध्ये’ उपलब्ध आहे. मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर ही माहिती पाहायला मिळेल. या शिवाय ही माहिती ‘ krishi.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर निविष्ठामधील कीटनाशके या मेन्यूत मिळेल. येथील शिफारशींनुसारच कीटनाशकांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी