शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याच्या खुनाच्या तपासासाठी ५ पथके

By admin | Updated: August 29, 2016 03:26 IST

साकोरी शिवारातील पानसरेमळा येथे घरात दाम्पत्याचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केलेल्या घटनेच्या तपासासाठी ५ पोलीस पथके परिसरात व अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाली आहेत.

आळेफाटा : साकोरी शिवारातील पानसरेमळा येथे घरात दाम्पत्याचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केलेल्या घटनेच्या तपासासाठी ५ पोलीस पथके परिसरात व अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाली आहेत. घटनेच्या निषेधार्थ रविवारी साकोरी ग्रामस्थांनी बंद पाळत या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. पानसरेमळा येथे बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शनिवारी आढळून आले होते. मृतदेहाशेजारी कुऱ्हाड; तसेच लगतच्या शेतात कपडे, पेटी आदी वस्तू सापडल्याने चोरीस प्रतिकार करताना या दाम्पत्याचा चोरट्यांनी खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी भेट देऊन तपासाविषयी सूचना केल्या. सायंकाळी श्वानपथक ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी आले. श्वान पथकाने घरापासून काही अंतरावरच माग काढला, तर घटनास्थळी असलेल्या रक्ताचे नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठविण्यात आले. याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई व पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितले, की तपासासाठी ५ पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरात व पुणे जिल्ह्यात दोन, तर शेजारील अहमदनगर जिल्ह्यात दोन पथके रवाना झाली आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही तपास करीत आहे. (वार्ताहर)