शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणावरून गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी ५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

पुणे : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ४ गुन्हेगारांसह ५ जणांना अटक ...

पुणे : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ४ गुन्हेगारांसह ५ जणांना अटक केली.

निखिल बाळ बोत्रे (वय ३०, रा. नवी पेठ), राकेश ऊर्फ रोहित प्रकाश खिलारे (वय ३७), प्रवीण ऊर्फ पिल्या गणपत गाडे (वय ३१, रा. शांतीनगर, दांडेकर पूल), सूरज संजय बोत्रे (वय २९, रा. नवी पेठ), अमरदीप मुकुंद भालेराव (वय २८, रा. शांतीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अक्षय शिवाजी किरतकर्वे (वय २५, रा. दांडेकर पूल, शांतीनगर, दत्तवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. अक्षय किरतकर्वे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. आरोपी व त्यांची सहा महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. अक्षय व त्याचा भाऊ ओंकार हे जुन्या दत्तवाडी रोडवरील ११ जुलै रोजी सायंकाळी पावणेसात वाजता जात होते. त्या वेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी कोयता, लाेखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करून अक्षय याचा खून केला. या वेळी तेथे मोठी गर्दी जमली होती. लोकांनी त्याच्या मदतीला येऊ नये, म्हणून त्यांनी हातातील हत्यारांची भीती दाखवून दहशत निर्माण केली. मध्ये आल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने लोकांनी दारे खिडक्या बंद केल्या होत्या.

आरोपींची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ३ व दत्तवाडी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी सांगितले की, निखिल बोत्रे, राकेश खिलारे, सूरज बोत्रे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करायची आहेत. त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलीय.