शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के सहकारी संस्था कागदावरच

By admin | Updated: June 30, 2015 00:46 IST

राज्यात सध्या तब्बल २ लाख ३० हजार २९५ नोंदणीकृत सहकारी संस्था असून, त्यांतील तब्बल ४० टक्के संस्थांचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे : राज्यात सध्या तब्बल २ लाख ३० हजार २९५ नोंदणीकृत सहकारी संस्था असून, त्यांतील तब्बल ४० टक्के संस्थांचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे सहकार विभागाच्या वतीने राज्यातील सर्व नोंदणीकृत सहकारी संस्थांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यासाठी येत्या १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकात दळवी यांनी दिली.सहकार विभागाच्या वतीने ई-सहकार या संकेतस्थळावर आपली माहिती (प्रोफाईल) उपलब्ध करून दिली असून, अत्यल्प संस्थांनी आपल्या ताळेबंदाची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. अनेक संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभादेखील होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्व ठेवून अनेक संस्थांनी आपले कामकाज बंद केले आहे. सर्वेक्षणानंतर ज्या संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणी नाही, अशा संस्थांची नोंदणी जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्धी देऊन रद्द करण्यात येईल. यामुळे बोगस व कार्यरत नसलेल्या संस्थांची संख्या कमी होऊन सहकार विभागाला शिल्लक राहिलेल्या सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच, राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना संस्थांची अद्ययावत व अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)