शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

गंडा घालणाऱ्याला ४ वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: January 7, 2015 00:45 IST

अनेकांना गंडा घालणाऱ्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुणे : जाहिरात देऊन १११ दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. झांबरे यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी ९ महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.अमनकुमार हरीश्वर पांडे ऊर्फ अमनकुमार राजेश्वर पांडे (रा. कडीर्ले निवास, साईनगर, चंदननगर, मूळ रांची व झारखंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र सुंदरलाल काची (५१, रा. नाना पेठ) यांनी लष्कर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी पांडे याने २०१०मध्ये महात्मा गांधी रस्त्यावरील स्टर्लिंग सेंटरमधील एका कार्यालयात युनायटेड इस्टेट इन कॉपोर्रेशन नावाने कार्यालय सुरू केले. या कार्यालयात शहरातील मुलींना कामाला ठेवले. त्याने जानेवारी २०१०मध्ये एका दैनिकात जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये जेवढी रक्कम गुंतवाल, त्यांच्या दुप्पट रक्कम १११ दिवसांत रोख किंवा चेकने देण्याचे आमिष दाखविले. वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून फिर्यादी राजेंद्र काची ११ जानेवारी २०१० रोजी पांडेच्या कार्यालयात गेले. पांडे याने काची यांचा विश्वास संपादन केला. त्या वेळी काची यांनी २ लाख ५० हजार रुपये भरले. पांडे याने काचींना पैसे मिळाल्याची पावती देऊन ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर करार केला. त्याच वेळी लगेचच आरोपीने काची यांना ५ लाखांचा धनादेश दिला. धनादेश न वटल्याने काची यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. बी. आर. पाटील यांनी ८ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादीसह फसवणूक झालेले इतर तीन जण, तपास अधिकारी, आरोपीला भाडेतत्त्वावर कार्यालय देणारे मालक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. (प्रतिनिधी)४काची यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपी पांडे याने दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून १०१ लोकांना ३ कोटी ३५ लाख ६६ हजार ३०१ रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर एका वर्षानंतर १६ जुलै २०११ रोजी पोलिसांनी त्याला डाल्टनगंज येथून अटक केली.