चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षीय चिमुकलीवर १२ वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:16 IST2021-11-28T17:15:41+5:302021-11-28T17:16:48+5:30

पोलिसांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला

4 year old girl sexually abused by a 12 year old boy for showing the chocolate in pimpri chinchwad | चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षीय चिमुकलीवर १२ वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षीय चिमुकलीवर १२ वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी : चॉकलेट आणण्यासाठी पैसे देतो, असे आमिष दाखवून चार वर्षीय मुलीवर १२ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नेवाळे वस्ती, चिखली येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी शनिवारी (दि. २७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती येथे आई - वडिल आणि ही चार वर्षाची मुलगी असे कुटुंब राहत आहे. ही मुलगी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरी खेळण्यासाठी गेली. चाॅकलेट आणण्यासाठी पैसे देतो, असे आमिष १२ वर्षीय मुलाने दाखविले. त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

Web Title: 4 year old girl sexually abused by a 12 year old boy for showing the chocolate in pimpri chinchwad