विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशाचे 35 हजार लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:07 IST2023-12-11T13:06:15+5:302023-12-11T13:07:18+5:30

अज्ञात चार आरोपी विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

35,000 was looted from a passenger in the airport police station | विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशाचे 35 हजार लुबाडले

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशाचे 35 हजार लुबाडले

किरण शिंदे

पुणे : विमानतळपोलिस स्टेशनच्या हद्दीत गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला काला पिला जुगार खेळण्याचे आमिष दाखवून त्याच्या जवळील पस्तीस हजार रुपये लुबाडले. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी किशोर एकनाथ खंडागळे (वय 31) या प्रवाशाने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार आरोपी विरोधात विमानतळपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या बुलढाणा या गावी जाण्यासाठी खराडी बायपास या ठिकाणी बसची वाट पाहत होते. यावेळी त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि त्याने ओळख काढत फिर्यादी सोबत बोलणे सुरू केले. यावेळी त्या व्यक्तीने फिर्यादीला काला पिला जुगार खेळायला घेऊन जाऊन तिथे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी यांनी पस्तीस हजार रुपये जिंकले आहेत असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी मी खेळलोच नाही तर मी कसा जिंकलो असे विचारले. 

त्या ठिकाणी असलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना तुमच्याकडे पैसे असल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही असे बोलून फिर्यादी यांच्या मोबाईल वरून जबरदस्तीने 35 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 35,000 was looted from a passenger in the airport police station