शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पवार-पाटील संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 16:23 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे.

ठळक मुद्देथेट लढतीत दोन वेळा पवार विजयी

- रविकिरण सासवडेबारामती :लोकसभेला मदत करून सुद्धा पवारांनी मला फसवलं , असा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील गोटात दाखल झाले खरे, परंतू इंदापूर तालुक्यात पाटील-पवार संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास आहे. आठव्या आणि अकराव्या लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकराव पाटील आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या दोन्ही लढतीत पवार विजयी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदार संघ म्हणून या तालुक्यातील मतदारांवर पवार  घराण्याचा प्रभाव आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९८४ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र १९८५ साली शरद पवार यांनी लोकसभा सदस्यात्वाचा राजिनामा दिल्याने पोटनिवडणुक झाली. यावेळी काँग्रेसकडून शंकरराव पाटील तर जनता पक्षाच्या वतीने संभाजीराव काकडे यांनी निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत देखील पवार-पाटील घराण्यात सुप्त संघर्ष दिसून आला होता. जनता पक्षाच्या संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. या निडणुकीत शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांच्या विरोधात काकडे यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.  दरम्यान १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस (आय) पक्षात प्रवेश झाला. या लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या संभाजीराव काकडेयांचा पराभव केला. यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९१ सालीपार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुतने अजित पवार यांच्यासाठी राजकिय खेळी खेळली.  विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यात शरद पवार यशस्वी झाले. अजित पवार यांनी ही निवडणुक जिंकली. त्यानंतर १९९६ साली लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून शरद पवार, तर काँग्रेसने डावलल्यामुळे अपक्ष म्हणून शंकरराव पाटील यांनी पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला. पवार यांनी अपक्ष उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात ४ लाख २७ हजार ५५९ मते मिळवली, आणि विजयी झाले.यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंदापूरमधून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पवार-पाटील घराण्याती संघर्ष कमी करत २०१४ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेतल्या.  मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवारआणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे.

* हर्षवर्धन पाटील यांनीच लावला काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग

१९९१ ते १९९६ केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर चांगली पकड होती. १९९५ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान इंदापूरचे तत्कालिन काँग्रेसचे आमदार गणपतराव पाटील यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. हर्षवर्धन पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावर अपक्ष निवडणुक लढवली. आतापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकणाºया येथील मतदारांनी प्रथमच काँग्रेसच्या विद्यमान आमदारास पराभूत करून बंडखोर हर्षवर्धन पाटील यांना निवडूण दिले होते. प्रथमच आमदार झालेले हर्षवर्धन पाटील तत्कालिन युती शासनाच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री देखील झाले होते. यानंतर देखील १९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे किसन नरूटे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर निंबाळकर यांच्यासोबत अपक्ष हर्षवर्धन पाटील यांचा सामना झाला. याही निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करीतहर्षवर्धन पाटील आमदार झाले. २००४ मध्ये देखील पाटील यांनी अपक्ष राहूनच विजय मिळवला होता. १९९६ साली काँग्रेसपासून दुरावलेल्या पाटील घराण्याने २००९ व २०१४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला.--------------------

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस