पुण्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात 335 जणांनी गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 21:49 IST2019-01-06T19:07:33+5:302019-01-06T21:49:56+5:30
देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र असताना एकट्या पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 335 नागरिकांनी रस्ते अपघातात आपला प्राण गमवला आहे.

पुण्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात 335 जणांनी गमावले प्राण
पुणे : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र असताना एकट्या पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 335 नागरिकांनी रस्ते अपघातात आपला प्राण गमवला आहे. यातही दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. नियम न पाळण्याबराेबरच विविध कारणे या अपघातांना कारणीभूत आहेत.
रस्ते अपघातात मृत्यू हाेणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यावर केंद्रीय रस्ते अपघात समितीने चिंता व्यक्त केली हाेती. अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याचे आवाहन वेळाेवेळी प्रशासनाकडून करण्यात येत असते. तसेच सुप्रिम काेर्टाच्या आदेशानुसार आता जखमी व्यक्तीचे प्राण वाचविणाऱ्याला काेर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2018 या कालावधीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 272 जणांनी अपघातात प्राण गमवले आहेत. त्यात पादचाऱ्यांची संख्या 72, सायकलस्वार 4, दुचाकी 148. फाेरव्हिलर 18, बस 12, ट्रक 3 तर इतर 25 जणांचा यात समावेश आहे. सप्टेंबर ते नाेव्हेंर 2018 या कालावधीत केवळ पुणे शहरात 63 जणांचे रस्ते अपघातात प्राण गेले आहे. त्यात पादचारी 22, सायकलस्वार 2 , दुचाकी 36 तर फाेरव्हिलरच्या अपघातात 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
रस्ते अपघात सध्या चिंतेची बाब झाली आहे. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यात नियम न पाळणे, रस्त्यांची दुरावस्था व इतर घटक कारणीभूत आहेत.