पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:16 IST2025-01-06T10:16:21+5:302025-01-06T10:16:32+5:30

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला

32 flights from Pune delayed due to dense fog Passengers suffer, air services affected | पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

पुणे : दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत असून, शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल ३२ विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शनिवारी सकाळी दिल्लीमध्ये दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून इतर ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना मोठा फटका बसला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली येथे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून दिल्ली व इतर ठिकाणी जाणाऱ्या तब्बल ३१ विमानांना अर्ध्या तासांपासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे पुणे व दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांना थांबण्यासाठी जागादेखील नव्हती. विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला. त्यामुळे दिल्लीहून पुण्यात येणाऱ्यांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. पुणे विमानतळावर, तर काही प्रवाशांना खाली बसण्याची वेळ आली होती. दुपारी उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास करता आला. रविवारी सकाळीदेखील दिल्लीसह इतर शहरांत जाणाऱ्या विमानांना उशीर झाले आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना त्रास झाला.

Read in English

Web Title: 32 flights from Pune delayed due to dense fog Passengers suffer, air services affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.