शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटमध्ये ३०० मांजरी ! सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:36 IST

मांजरांच्या विष्ठाची प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅटधारकाला ४८ तासांत या मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची याेग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाेलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

पुणे : हडपसर भागातील एका साेसायटीतील फ्लॅटमध्ये तब्बल ३०० मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याबाबत साेसायटीतील नागरिकांनी पाेलिसांकडे तक्रार केल्यानंतर, हडपसर पाेलिस व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. मांजरांच्या विष्ठाची प्रचंड दुर्गंधी पसरल्याने फ्लॅटधारकाला ४८ तासांत या मांजरी दुसरीकडे हलवून त्यांची याेग्य देखभाल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाेलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय माेगले यांनी सांगितले की, हडपसरमधील मार्वल बाऊण्टी काे.-ऑपरेटिव्ह हाैसिंग साेसायटीत फ्लॅट नंबर सी-९०१ मध्ये रिंकू भारद्वाज व रितून भारद्वाज यांनी घरात  मांजरी पाळल्याची व त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास हाेत असल्याची तक्रार पाेलिसांकडे आली. त्यानुसार पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी व महिला पाेलिस यांनी जाऊन पाहणी केली. साडेतीन बीएचके फ्लॅट मध्ये ३०० पेक्षा जास्त मांजरी होत्या. फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज व चार महिला कर्मचारी हाेत्या. मांजरींचे रेबीज लसीकरण तसेच नसबंदी केली नव्हती. काही मांजरी गर्भवती व काही मांजरींना पिल्ले झाली आहेत. त्यांचे काेणत्याही प्रकारचे वैद्यकीय रेकाॅर्ड ठेवलेले नव्हते.

टॅग्स :Puneपुणे