शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचारी पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:47 PM

हजेरीच्या नोंदी न आल्याने सुमारे तीस कर्मचा-यांना अद्याप या महिन्यात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी निर्णय घेण्यासाठी प्रकरण तूर्तास अतिरिक्त आयुक्तांकडे

पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांच्या नियुक्त्या अन्य विभागात केल्या आहेत. त्यांचे वेतन आरोग्य विभागाकडूनच केले जाते. परंतु, ज्या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. हजेरीच्या नोंदी न आल्याने सुमारे तीस कर्मचा-यांना अद्याप या महिन्यात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. संबधित विभागाला पत्र पाठवूनही कर्मचा-यांच्या हजेरीच्या नोंदी उपलब्ध करून न दिल्याने मुख्य लेखापाल विभागाने वेतन काढण्यास नकार दिल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.     पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन होते. तत्पुर्वी सर्वच विभागातून वेतनाची बिले तयार करून मुख्य लेखापाल विभागाकडे पाठविली जातात. त्यानुसार लेखापाल विभाग अधिकारी आणि कर्मचा-यांचे वेतन बँकेत जमा करतात. परंतू या महिन्यात आरोग्य विभागाकडील सुमारे तीन कर्मचा-यांचे जून महिन्याचे वेतनच झाले नसल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचे चार कर्मचारी अन्न परवाना विभागाकडे नियुक्त आहेत. त्या कर्मचा-यांच्या हजेरीच्या नोंदी अद्याप आरोग्य विभागाकडे आलेल्या नाहीत. साधारण तीस कर्मचा-यांच्या वेतनाच्या डिटेल्स एकाचवेळी लेखापाल विभागाकडे पाठविल्या जातात. परंतु, चार कर्मचा-यांच्या हजेरी नोंदीच न मिळाल्याने आरोग्य विभागाच्या बिलानुसार वेतन करणे शक्य नसल्याचे लेखापाल विभागाकडून सांगण्यात आले. यानंतर अन्न परवाना विभागाला पत्र लिहून नोंदी मागविल्या आहेत. तूर्तास यावर निर्णय घेण्यासाठी प्रकरण अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविले आहे, असे डॉ. जाधव यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका