Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:33 IST2025-09-26T17:33:09+5:302025-09-26T17:33:20+5:30
तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास दोन किलो आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे

Pune: पुण्यात एकाच कुटुंबातील ३ महिला गांजा विकताना सापडल्या
पुणे: गांजाची विक्री करणाऱ्या एका कुटुंबातील तीन महिलांनापुणेपोलिसांनी अटक केली आहे. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली. या तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास दोन किलो आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे..सोनाबाई अंकुश पवार (वय ५०, रा. लक्ष्मीनगर मंदिराजवळ, खुडेवाडी, पुणे), सुवर्णा अशोक पवार (वय २५, रा. लक्ष्मीनगर मंदिराजवळ, खुडेवाडी, पुणे) आणि शालन कांतीलाल जाधव (वय ४५, रा. लक्ष्मीनगर मंदिराजवळ, खुडेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या या तीन महिलांची नावे आहेत..
विमानतळ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चंदननगर भागात काही महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत गांजा हस्तगत केला. अधिक चौकशीत या महिलांकडून गांजाची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. छापा टाकून त्यांच्याकडून तीस हजार रुपयांची रोकड व १.९५६ किलो गांजा जप्त करण्यात आला. या संदर्भात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले करत आहेत.