पुणे शहरात दिवसाढवळ्या गोळीबार करून 28 लाखांची रोकड लुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 16:44 IST2022-11-12T16:42:19+5:302022-11-12T16:44:32+5:30
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे...

पुणे शहरात दिवसाढवळ्या गोळीबार करून 28 लाखांची रोकड लुटली
पुणे : शहरातील मार्केटयार्ड परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दिवसाढवळ्या घडली. गोळीबार करत तब्बल 28 लाखांची रोडक पळवली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले होते. दुपारी 12 च्या सुमारास पाच-सहा आरोपींनी पी.एम. अंगडिया कार्यालयात जात गोळीबार केला आणि नंतर पैसे लुटले. पुणे शहरात दिवसा झालेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.
पाच ते सहा आरोपी दुपारी कार्यालयवळ आले. त्यांनी नंतर पिस्टल दाखवून कार्यालयातील व्यक्तीला बाहेर काढले. तिथे नंतर कार्यालयातील काचेवर आरोपींनी गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी पैसै घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले. चोरट्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. दिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.