शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

'त्या' बॅगांमध्ये सापडली २७९ कासवं, १२०७ इग्वाना अन् २३० बेटा फिश; लोहमार्ग पोलिसांनी तस्करीचा प्लॅन उधळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:00 IST

विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलीस दलाला मिळाली होती.

पुणे : कोरोना काळात देखील कडक निर्बंध असताना देखील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. तसेच अमली पदार्थ, विविध प्राण्यांच्या तस्करीचे प्रकार सुद्धा सुरूच असल्याचे समोर आले आहे. चेन्न्ईहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतून कासवे, इग्वाना आणि बेटा फिश माशांची बेकायदेशीर वाहतुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तरुणकुमार मोहन (वय २६, रा. लेनीननगर, अंबतूर, चेन्न्ई) आणि श्रीनिवासन कमल (वय २०, रा. कोल्लातूर, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. तेथून ते परदेशात पाठवण्याचा त्यांचा डाव असण्याची शक्यता होती. आंतरराष्ट्रीय तस्करी यानिमित्ताने पुढे आली आहे.

विविध मार्गावर रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांना सूचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्याकरिता सांगितले होते. गेले ८ ते १० दिवस त्या अनुंषगाने पेट्रोलिंग करण्यात येत होते. पुणे ते लोणावळा दरम्यान चेन्नई एल टी टी एक्सप्रेसमधील ए/१ बोगीमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडे एकूण ४ ट्रॅव्हल बॅगा व दोन सॅगबॅक होत्या. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची पाहणी केल्यावर त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश मिळाले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बँगांसह ताब्यात घेण्यात आले. 

वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने या प्राण्यांची नेमकी प्रजाती समजण्यासाठी व संख्या गणनेसाठी बावधन येथील रेक्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे घेऊन गेलो. या (संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही अफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस(african spurred tortoise/sulcata tortoise) जातीची कासवे आहेत. इग्नावा( iguana) हा सरड्यासारखा प्राणी आहे. या तस्कारांकडे २७९ कासवे, १२०७ इग्वाना, २३० बेटा फिश( beta fish) आढळून आले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना तेथेच जमा करण्यात आले आहेत.

हे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याने व या तस्करांनी कोणतेही सीमा शुल्क विभागाची परवानगी न घेता वाहतूक केल्याने दोघांना पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तस्करांनी हे प्राणी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. त्यांनी प्लास्टिक कंटनेरला भोके पाडली होती.

पोलीस अधिक्षक सदानंद वायसे -पाटील, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर -पवार, पोलीस निरीक्षकी मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनिल भोकरे, जगदीश सावंत, पोलीस हवालदार सुनिल कदम, सुहास माळवदकर, पोलीस नाईक दिनेश बोरनारे, फिरोज शेख, अमरदीप साळुंके, इम्तीयाज आवटी, पोलीस शिपाई निलेश बिडकर, संदीप पवार, विक्रम मधे, माधव केंद्रे, महिला शिपाई बेबी थोरात या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेChennaiचेन्नईCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबईSmugglingतस्करी