पुण्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना आग, २५ ते ३० वाहने जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 18:00 IST2021-02-27T17:53:22+5:302021-02-27T18:00:30+5:30

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली होती. 

25 to 30 vehicles were burnt in the fire by at Pune | पुण्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना आग, २५ ते ३० वाहने जळून खाक 

पुण्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना आग, २५ ते ३० वाहने जळून खाक 

पुणे : पुणे शहरातील मॉडर्न महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीच्या घटनेत अंदाजे २५ ते ३० वाहने जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या मॉडर्न कॉलेजजवळील पोलिसांनि कारवाईत जप्त केलेले वाहने ठेवली जातात. त्याच वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडली शनिवारी घडली. आगीची भीषणता इतकी होती काही क्षणात २५ ते ३० वाहने जाळून भस्मसात झाली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली होती. 

Web Title: 25 to 30 vehicles were burnt in the fire by at Pune