शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाण्यासाठी २४० कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 25, 2016 00:28 IST

अमृत योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या २४० कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा वितरणव्यवस्था आणि बागा-उद्यान प्रकल्पांसाठी

पिंपरी : अमृत योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या २४० कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा वितरणव्यवस्था आणि बागा-उद्यान प्रकल्पांसाठी शासनाने पहिला हप्ता महापालिकेला दिला आहे. १२ कोटी १५ लाखांचे अनुदान महापालिकेला मिळाले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकल्पामुळे २०१९ मध्ये शहरात २४ तास पाणीपुरवठा होईल, असा दावाही केला.अमृृत योजनेस शनिवारी वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने योजनेचा आढावा घेण्यात आला. या वेळी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, संजय कांबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञानप्रमुख निळकंठ पोमण उपस्थित होते.तानाजी शिंदे म्हणाले, ‘‘२५ जून २०१५ रोजी अमृत अभियानाची सुरुवात झाली. सहभागी शहरामध्ये समाधानकारक पाणीपुरवठा पुरविणे, आश्वासक विद्युतपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छताविषयक व्यवस्था, प्रभावी नागरी दळणवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महिला आणि बालकांची सुरक्षितता, आरोग्य शिक्षण आदी पायाभूत सुविधा आवश्यक ठरविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील सुधारणा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला आहे. पाणीपुरवठा व्यवस्था वितरणासाठी हजार कोटी, जलनिस्सारण प्रकल्पासाठी २८१ कोटी, बागा आणि उद्याने विकासासाठी १११ कोटी, पावसाळी गटार योजनेसाठी १३२९ कोटी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ४७७ कोटी असा ३१९७ कोटींचा आराखडा शासनास पाठविला होता. त्यापैकी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचा विषयास मंजुरी दिली आहे. शहरातील ६० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून २४० लाखांचा निधी मंजूर झाला तसेच, आकुडीर्तील उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटीचा निधीही मंजूर केला. (प्रतिनिधी)