भीमा-कृष्णा खोऱ्यात 238 टीएमसी पाणीसाठा; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा चांगला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 12:37 PM2020-08-08T12:37:46+5:302020-08-08T12:43:01+5:30

जून आणि जुलै या दोन महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाले होते.

238 Tmc water storage in bhima and krishna river valley | भीमा-कृष्णा खोऱ्यात 238 टीएमसी पाणीसाठा; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा चांगला परिणाम

भीमा-कृष्णा खोऱ्यात 238 टीएमसी पाणीसाठा; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा चांगला परिणाम

Next
ठळक मुद्देभीमा उपखोऱ्यात अद्यापही पन्नास टक्क्यांच्या खाली पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्याने धरणांतीलपाणी साठ्याबाबात गंभीर परिस्थितीत निर्माण झाली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. आज अखेर भीमा-कृष्णा खो-यात 238.67 टीएमसी म्हणजे 55.84 टक्के पाणीसाठा निर्माण झाला. यामध्ये भीमा उपखोऱ्यात अद्यापही पाणी साठा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असून, कृष्णा उपखोऱ्यातील धरणांमध्ये 70 टक्क्यांवर पोहचले आहे. 
यंदाच्या पावसाळा हंगामातील पहिले दोन महिने म्हणजे जुन, जुलैमध्ये पावसाने पूर्णपणे दाडी मारली. यामध्ये जुनच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाले आणि नद्यांना पण पाणी आले. या चक्रीवादळात झालेल्या पावसावर शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने दडी दिली. यामुळे पेरणी झालेली पिके धोक्यात आली होती. तसेच धरणांतील पाणी साठा 15-20 टक्क्यांवर आले होते. दर वर्षी 15 ऑगस्टपर्यंत धरणसाठा शंभर टक्के होत असे. परंतु यंदा पाऊसच न झाल्याने धरणांचा पाणी साठा खूपच कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून, शुक्रवार (दि.8) रोजी देखील पाऊस सुरूच आहे. यामुळेच धरणासाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. भीमा खोऱ्यातील 27 धरणांमध्ये आज अखेर 90.90 टीएमसी म्हणजे 41.78 टक्के पाणीसाठ जमा झाला आहे. तर कृष्णा खो-यातील 12 धरणांमध्ये 147.77 टक्के म्हणजे तब्बल 70.41 टक्के पाणीसाठ तयार झाला आहे. 
गत वर्षी भीमा उपखो-यातील बहुतेक धरणे शंभर टक्के भरली होती. तर कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये सरासरी 70-80 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी हीच परिस्थितीत उलटी असून, कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा तयार झाला असून, भीमा खोऱ्यातील धरणे अद्याप ही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 
----
धरणांतील पाणी साठ्याची माहिती 
धरण          क्षमता (टीएमसी) आजचा साठा        टक्केवारी
टेमघर         3.71                 1.29                 34.86
वरसगाव     12.82               6.52                 50.85
पानशेत       10.65              6.40                 60.07
खडकवासला 1.97               1.69                85.53
पवना          8.51               3.98                40.74
मुळशी       18.47               10.56              57.15
चासकमान 7.58                 1.73                 22.83
भामाआसखेड 7.67            3.73                48.54
माणिकडोह 10.17             1.50                14.71
येडगाव       1.94               0.74               38.64
डिंभे          12.49             5.33               42.64
उजनी।        53.57            9.60                17.91

Web Title: 238 Tmc water storage in bhima and krishna river valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.