शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलणारे २१ हजार वाहनचालक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे, असे असले तरी आपल्या जीवापेक्षा अनेकांना मोबाईलचा कॉल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे, असे असले तरी आपल्या जीवापेक्षा अनेकांना मोबाईलचा कॉल घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. अशा २१ हजार ८५१ वाहन चालकांवर गेल्या वर्षभरात पोलिसांनी कारवाई केली आहे. ही केवळ पोलिसांनी केलेली कारवाई आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालविताना मोबाईलवर सर्रास बोलताना जागोजागी आढळून येत असतात.

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाईलवर बोलणा-या २१ हजार ८५१ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोबाईलवर बोलणा-या वाहनचालकाला २०० रुपये दंड केला जातो.

लॉकडाऊनमुळे काही महिने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे चार महिने कारवाई झाली नव्हती. नाही तर याचा आकडा आणखी वाढू शकला असता. विना गिअरच्या दुचाकी वाहनांमुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एका हातात मोबाईल धरून किंवा कान आणि खांद्या वाकडा करून त्यात मोबाईल धरून वाहनचालक बोलत जात असल्याचे दिसून येतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण, याची जाणीव बहुतांश वाहनचालकांकडे नसल्याचे दिसून येते.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, वाहन चालविताना चालकाचे सर्व लक्ष वाहन चालविण्याकडेच असले पाहिजे. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याने चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते. काही क्षण जरी लक्ष विचलित झाले तर अपघाताची शक्यता वाढते. दुचाकीचालक तसेच चारचाकी चालक स्वत: बरोबरच रस्त्यावरील इतर वाहने, पादचारी यांना धोका पोहचवू शकतात. तसेच गाडीत बसलेल्या इतरांच्या जीवाला ते धोका निर्माण करीत असतात. एक सेंकदभराचेही दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतू शकते. पण

.......

विनाहेल्मेट आणि झेब्रा कॉसिंगवर वाहन पुढे करणे, याच्या पाठोपाठ वाहतूक नियमभंगाखाली वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-यावर तिस-या क्रमांकाची कारवाई करण्यात आली आहे.

.......

आपले घरी कोणीतरी वाट पहात आहे. याची जाणीव ठेवून वाहनचालकाने संपूर्ण लक्ष वाहन चालविण्याकडे ठेवावे. मोबाईलवर बोलून तुम्ही तुमच्या व इतरांचा जीव गमावण्याची शक्यता वाढते. अशा दुर्लक्षामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झालेली आहे. हे पाहता चालकांनी वाहन चालविताना मोबाईलवर न बोलता पोलिसांना सहकार्य केले तर कारवाईची वेळ येणार नाही.

-राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा