हडपसरमधील हॉटेलमध्ये 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 14:34 IST2023-08-23T14:32:32+5:302023-08-23T14:34:53+5:30
तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

हडपसरमधील हॉटेलमध्ये 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल
- किरण शिंदे
पुणे :हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वैदवाडी येथील एम के एम कॅन्टीन (केरला हॉटेल) या ठिकाणी काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी हॉटेलमधीलच दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 20 ऑगस्ट 2023 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला.
शहजाद इमामन अन्सारी (वय 30, रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम इद्रिस शेख (वय 43) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर हडपसर परिसरातच राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी काम करत असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचारी शहजाद इमामन अन्सारी याने हॉटेलमध्ये कोणी नसताना फिर्यादी यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दुसरा आरोपी मोहम्मद सलीम इद्रिस शेख याने वारंवार फिर्यादी यांना "मुझे भी चाहिये, मुझे भी करना है" असे बोलून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यानंतर मात्र फिर्यादी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.