पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तब्बल दहा वर्षांनंतर सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य तपासामुळे शक्य झाली. रमेश सदोरमल केसवानी (७३, रा. पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.
२०१६ मध्ये फिर्यादी तरुणी शिक्षणासाठी लोकलने तळेगाव ते कासारवाडी दरम्यान प्रवास करत असताना आरोपी रमेश केसवानी याने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला होता. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने साक्षीपुरावे व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत आरोपीला सहा महिन्यांच्या सश्रम कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनीही पुरावे व्यवस्थितरीत्या सादर केले. या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस प्रमोद खोपीकर यांच्यासह पथकाने केली.
Web Summary : A Pune court sentenced a 73-year-old man to six months in jail for molesting a college student in 2016. The conviction followed a decade-long trial. Police investigation and strong prosecution led to the verdict. The incident occurred on a local train between Talegaon and Kasarwadi.
Web Summary : पुणे की अदालत ने 2016 में एक कॉलेज छात्रा से छेड़छाड़ करने के मामले में 73 वर्षीय व्यक्ति को छह महीने की जेल की सजा सुनाई। एक दशक तक चले मुकदमे के बाद यह फैसला आया। पुलिस जांच और मजबूत अभियोजन के कारण फैसला आया। घटना तालेगांव और कासारवाड़ी के बीच एक लोकल ट्रेन में हुई।