नात्याला काळीमा फासणारी घटना! पुण्यात सख्ख्या बापाकडूनच 19 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 10:54 IST2022-09-12T10:51:01+5:302022-09-12T10:54:32+5:30

वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील घटना...

19-year-old girl was sexually abused by her father in Pune latest crime news | नात्याला काळीमा फासणारी घटना! पुण्यात सख्ख्या बापाकडूनच 19 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

नात्याला काळीमा फासणारी घटना! पुण्यात सख्ख्या बापाकडूनच 19 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

-किरण शिंदे

पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरातून नात्याला काळीमा फासण्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नराधम पित्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार 51 वर्षीय पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडला.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीचा वडील आहे. रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपीने पीडित मुली सोबत अश्लील चाळे करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका करून घेतली.

त्यानंतर झालेल्या प्रकाराविषयी मुलीने पोलिसांना सांगितले. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 19-year-old girl was sexually abused by her father in Pune latest crime news