पुणे : बाणेर येथील पासपोर्ट कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना घडली. बाॅम्बच्या अफवेमुळे पासपोर्ट कार्यालयात घबराट उडाली. पासपोर्ट कार्यालयात ईमेलद्वारे बाॅम्बची धमकी देणाऱ्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाणेरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या एका विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील पासपोर्ट कार्यालयात सायनाइड गॅस असलेले १९ बाॅम्ब ठेवण्यात आले आहेत, अशी धमकी देणारा मेसेज सौरभ बिश्वास नावाच्या एकाने ईमेलवरून पाठवला होता. शुक्रवारी (दि. २०) बाॅम्बस्फोट होणार असल्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. घटनास्थळी लगेचच बाॅम्बशोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पासपोर्ट कार्यालयाची तपासणी करण्यात आली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. या घटनेमुळे तासभर पासपोर्ट कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले. सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी पासपोर्ट कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता.
Web Summary : Pune's passport office received an email threatening 19 cyanide bombs. Police investigated after the bomb threat was made by suspect Saurabh Biswas. No bombs were found, but an investigation continues, and an IT Act case was registered.
Web Summary : पुणे के पासपोर्ट कार्यालय को 19 साइनाइड बमों की धमकी मिली। सौरभ बिश्वास नामक संदिग्ध द्वारा धमकी के बाद पुलिस ने जांच की। कोई बम नहीं मिला, लेकिन जांच जारी है, और आईटी अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया।