शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनद्वारे भरले १९ कोटी वीजबिल

By admin | Updated: March 11, 2017 03:05 IST

महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलापोटी १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाइन भरणा केला आहे.

बारामती : महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलापोटी १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाइन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल आहे. महावितरणने वेबसाईटवर आॅनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डांसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.फेब्रुवारी महिन्यात बारामती परिमंडलात १ लाख ४६ हजार ९१४ वीजग्राहकांनी १९ कोटी ३८ लाख रुपयांच्या वीजबिलांचे आॅनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील २६ हजार ३५८ ग्राहकांनी ५ कोटी ३० लाख, सोलापूर मंडलातील ३८ हजार ६४५ ग्राहकांनी ६ कोटी १६ लाख, तर सातारा मंडलातील ८१ हजार ९११ ग्राहकांनी ७ कोटी ९२ लाख रुपयांचे वीजबिल आॅनलाईन भरले आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसते. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल आहे. महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा ३ रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय, मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल आॅनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.