धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:28 IST2025-01-13T15:28:07+5:302025-01-13T15:28:53+5:30

घटनेनतंर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

17-year-old dies after falling from a moving tractor wheels run over him | धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे धावत्या ट्रॅक्टरवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमेश्वरनगर येथे आप्पासाहेब जगताप नगर येथे करंजेपूल-वाणेवाडी रस्त्यावर ही घटना घडली. सांगसिंग दीपसिंग सिंग सध्या राहणार करंजेपूल (ता. बारामती, जि. पुणे मूळ रा. पद्रोडा, ता. भनियाना जि. जैसलमेल (राजस्थान) हा तरुण या अपघातात मृत्युमुखी पडला आहे. 

सांगसिंग हा या भागात फर्निचरचे काम करत होता. करंजेपूलकडून वाणेवाडीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला त्याने लिफ्ट मागून तो कामानिमित्त वाणेवाडीच्या दिशेने निघाला होता. आप्पासाहेब जगताप नगरजवळ आल्यानंतर त्याचा तोल जाऊन तो डांबरी रस्त्यावर पडला व ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या दोन्ही ट्रॉलीची चाके त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून करंजेपूल पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: 17-year-old dies after falling from a moving tractor wheels run over him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.