१६ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच केला लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 03:40 PM2022-03-22T15:40:08+5:302022-03-22T15:44:05+5:30

१६ वर्षीय मुलीची सावत्र बापाविरोधात तक्रार

16 year old girl sexually abused by stepfather shocking incident in pune | १६ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच केला लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

१६ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच केला लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

पुणे : ताडीवाला रोड येथील एका ११ वर्षाच्या मुलीवर बाप, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असताना आता सावत्र बापच नराधम बनल्याचे प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापानेच गेल्या ४ वर्षापासून १६ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा निष्पन्न झाले आहे.

ही घटना वडगाव शेरी व वाघोली येथील दोन सोसायटींमध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान आणि २०१९ ते २०२० दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना त्याने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. वडगाव शेरी आणि वाघोली येथील सोसायटीमध्ये रहात असताना हा प्रकार होत होता.

दरम्यान हा सावत्र बाप आसामला निघून गेल्यानंतर आता मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. येरवडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे

Web Title: 16 year old girl sexually abused by stepfather shocking incident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.