१५ वर्षाच्या मुलाकडून १४ वर्षाची मुलगी ८ महिन्यांची गर्भवती, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:35 IST2025-08-25T16:34:12+5:302025-08-25T16:35:05+5:30
मुलाने मागील २ वर्षांपासून मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते

१५ वर्षाच्या मुलाकडून १४ वर्षाची मुलगी ८ महिन्यांची गर्भवती, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे: १४ वर्षे ८ महिन्यांची असलेल्या एका मुलीला फिट आल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ही मुलगी ८ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. २४) उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाची मुलगी आणि १५ वर्षाचा मुलगा हे दोघे गेली २ वर्षांपासून मित्र आहे. या मुलाने मागील २ वर्षांपासून मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवले होते. तसेच अन्य एका महिलेच्या घरी घेऊन जाऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पटेल करत आहेत.