उसाचे १४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप, साखर हंगामाचा पहिला महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:29 AM2017-12-01T02:29:37+5:302017-12-01T02:30:01+5:30

साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

 14 lakh 60 thousand metric tons of sugarcane, first month of sugar season | उसाचे १४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप, साखर हंगामाचा पहिला महिना

उसाचे १४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप, साखर हंगामाचा पहिला महिना

Next

सोमेश्वरनगर : साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तर ऊस उत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग रात्रंदिवस धडपडत आहे.
राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन ऊसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.
त्यामुळे ऊस तुटून गेल्यानंतर गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. दरम्यान कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हताशी धरून बैठकांवर बैैठका घेत असून रोजची रणनीती आखत आहे. कारखान्यांनी सध्या सभासदांचा ऊस मागे ठेवत असून बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त मिळवता येईल याकडे कारखान्यांचे लक्ष लागले आहे. ऊसाचे
अपुरे क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव याकडे जादा
गाळप करण्यासाठी कारखाने
धडपडत होते.
चालू हंगामात जो कारखाना जादा ऊसाचे गाळप करणार त्या कारखान्याला अधिक नफा होणार, त्यामुळे जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केली होती. अनेक कारखान्यांनी जागेवरच ‘काटा पेमेंट’ देण्याचे चालू केले आहे.

बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने २ लाख ३७ हजार १६० मे. टन ऊसाचे गाळप करून २ लाख २६ हजार ८०० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विघ्नहर कारखान्याने १ लाख ७० हजार ६६० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ७४ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला.
१ लाख ५८ हजार ६०० मे. टन ऊसाचे गाळप करून १ लाख ६४ हजार ९०० पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर तिसºया क्रमांकावर आहे.

यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने ऊसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर उतारा पावणेअकरा गेले आहेत. सर्व मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समजल्या जाणाºया ‘हाय रिकव्हरी पिरियड’मध्ये जिल्ह्यातील अनेक कारखाने साखर उताºयात पावने अकरा टक्क्यांवर पोहचले आहेत.
 

Web Title:  14 lakh 60 thousand metric tons of sugarcane, first month of sugar season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे