शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जलस्वराज्य’साठी १२२ गावे

By admin | Updated: October 19, 2015 01:57 IST

गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे.

भोर : गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील ग्रामीण भागात मागणी व लोकसहभाग तत्त्वावर जलस्वराज्य कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागाला गुणवत्तापूर्ण, शाश्वत व पुरेसे पाणी पुरवणे हा मुख्य हेतू आहे. राज्यातील ३३ पैकी १२ जिल्ह्यांत जलस्वराज्य २ हा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्यामार्फत याचे नियंत्रण ठेवले जाणार आहे. यात निमशहरी घटकांतर्गत १९, पाणीटंचाईग्रस्त घटकांतर्गत २८, पाणी गुणवत्ताबाधित घटकांतर्गत २३, भूजलस्तर जलधर व्यवस्थापन घटकांतर्गत ५२ अशी १२२ गावे वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)वाढते औद्योगिकीकरण, रासायनिक खतांचा अतिवापर, शेती वापरासाठी भूजलचा अतिउपसा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात विद्राव्य क्षार व फ्लोराइड आणि रासायनिक घटकांमुळे पाणी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. हे पाणी प्यायल्याने वाड्या-वस्त्यांवरील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून जलस्वराज्य २ अंतर्गत १२ जिल्ह्यांत गुणवत्ताबाधित गावांना स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावांत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जलधर व्यवस्थापनमधून आंबेगाव, इंदापूर, खेड, शिरूर, पुरंदर तालुक्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे गावांत ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या लहान वाड्या-वस्त्यांमध्ये सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी भोर, आंबेगाव, मुळशी, जुन्नर, खेड, वेल्हे या तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावे निमशहरी घटकांतर्गत निवडण्यात आली आहेत. ज्या गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २५ हजारांपेक्षा कमी आहे. निमशहरी भाग, नगरपालिका नगर परिषद यांच्यालगत आहे, अशी जुन्नर, शिरूर, पुरंदर, इंदापूर व दौंड तालुक्यातील गावे यात आहेत. .