शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 11:49 IST

शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़...

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत शहरातून तब्बल १ हजार ५५० वाहने गेली आहेत़ चोरीला २० लाख ६२ हजारांचा माल चोरीला 

पुणे : शहरातील वाढत्या वाहनसंख्येबरोबर वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, बुधवारी एका दिवसात तब्बल १२ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची शहरात नोंद करण्यात आली़. त्यात २० लाख ६२ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे़. १ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत शहरातून तब्बल १ हजार ५५० वाहने चोरी गेली आहेत़. शहरात होणारे जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, चोऱ्यांपेक्षा वाहनचोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत़. त्याच वेळी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे २८ टक्के इतके आहे़. शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़. यावर्षी १ जानेवारीपासून २७ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ५५० वाहने चोरीला गेली असून, त्यात सर्वाधिक उपनगरांचा भाग असलेल्या परिमंडळ ५ मधून तब्बल ४२७ वाहने चोरीला गेली आहेत़. बुधवारी एकाच दिवशी तब्बल १२ वाहने चोरीला गेल्याची नोंद शहरातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़. त्यात हडपसरमधून एक ट्रक व २ मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत़. सिंहगड रोड पोलीस ठाणे ३, चतु:शृंगी २ तसेच मुंढवा, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येक एक दुचाकी चोरीला गेल्या आहेत़. भारती विद्यापीठ पोलिसांनी २ मोटारसायकली चोरणाºया दोघांना अटक केली आहे़. १ जानेवारी ते १ नोव्हेंबरपर्यंत २०१८ मध्ये १ हजार ६७३ वाहने चोरीला गेली होती़ त्यापैकी ५९६ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले होते़ हे प्रमाण ३५ टक्के होते़. याच कालावधीत २०१९ मध्ये १ हजार ४४७ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ४०९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे़. हे प्रमाण २८ टक्के इतके आहे़ भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहनचोरी करणाºया दोघांना अटक केली. असून, त्यांच्याकडून २ गुन्हे उघडकीस आणले आहेत़. विशाल संतोष खैरे (वय १९) आणि राहुल भीमा पिंपळे (वय २०, दोघे रा़ धाऊरवाडी रोड, ता़ खंडाळा, जि़ सातारा) अशी त्यांची नावे आहेत़. त्यांनी सुखसागरनगर येथील दोन्ही गाड्या चोरून नेल्या. .......१ जानेवारी ते २७ नोव्हेंबरपर्यंत चोरीला गेलेली वाहनेपरिमंडळ १    २९०परिमंडळ २    २९८परिमंडळ ३    २१८परिमंडळ ४    ३१७परिमंडळ ५    ४२७एकूण    १५५०

टॅग्स :Puneपुणेtheftचोरीtwo wheelerटू व्हीलरThiefचोरPoliceपोलिस