शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत.

पुणे : खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शेतीच्या पाण्यात कपात न करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतीला तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात खडकवासला कालवा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.खडकवासला प्रकल्पातून शेतीबरोबरच प्रामुख्याने पुणे शहरासाठीदेखील पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे कालवा समितीच्या बैठकीत अनेक वेळा शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पाहायला मिळतो. यावेळी देखील शहरातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा पवित्रा घेतला. तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी पाण्यावर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा हक्क असून, पुणेकरांनी अत्यंत काटकसरीने पाणी वापरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)४सध्या धरणात उपलब्ध असलेल्या २०.५४ टीएमसी पाणीसाठ्यातून शेतीसाठी एक रब्बी आणि दोन उन्हाळी आवर्तनासाठी ११.८० टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.४खडकवासला प्रकल्पातून वरसगाव, पानशेत, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सुमारे ६२ हजार १४६ हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.४यामध्ये रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतात. रब्बी हंगामातील ४५ दिवसांचे एक आवर्तन यापूर्वीच देण्यात आले असून, आता तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने खडकवासला प्रकल्पात सरासरीपेक्षा ७ ते ८ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांसह शेतकऱ्यांनीदेखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला. यामध्ये शहरातील पाणीगळती थांबविण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरित उपाय-योजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. तर, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ड्रीपवर शेती करण्याचा सूचना दिल्या. ८ हजार हेक्टर येणार ओलिताखालीमुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. त्यामुळे शहराचे अथवा शेतीचे पाणी कपात करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. -वृत्त/८