पुणे : वाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात पुणे विभागात तीन, तर अन्य सर्व विभागांत प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, तर चाकण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती. नव्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मितीसाठी त्यात येणारी तालुक्यांची संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी, तसेच दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यांतील सर्वात दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर तसेच प्रस्तावित कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ विचारात घेण्यात आले आहे.
तर नव्या अतिरिक्त तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासह संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून तालुक्यांतील सर्वांत दूरच्या गावांचे अंतर तसेच प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार करण्यात आला आहे.
प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालये
पुणे विभागात पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात कल्याण, तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव. छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यात किनवट. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर.
प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालये
तालुका- गावाचे नावकुर्ला- चेंबूरबोरिवली- मालाडअंधेरी- वांद्रेठाणे- नवीन मुंबईकल्याण - डोंबिवलीभिवंडी- भिवंडी (ग्रामीण)डहाणू- कासावसई- विरारपालघर- बोईसरराजापूर- रायपाटणखेड- चाकणफलटण- साखरवाडीकराड- उंब्रजउत्तर सोलापूर- वडाळाचंदगड- नजरे कार्वेनिफाड- लासलगावसिन्नर- सिन्नरबागलाण- नामपूरजळगाव- जळगावजामनेर- शेंदुर्णीचाळीसगाव- चाळीसगावनंदूरबार- नंदूरबारशहादा- शहादाअक्कलकुवा- मोलगीशिरपूर- शिरपूर शहरअकोले- राजूरनेवासा- घोडेगावसिल्लोड- अजिंठाबीड- नेकनूरआष्टी- कडाजालना- जालना शहर आणि राजूरपरभणी- परभणीजिंतूर- बोरीलातूर- लातूरनांदेड- नांदेडहदगाव- तामसामुखेड- मुक्रमाबादकिनवट- इस्लापूरअमरावती- अमरावती (ग्रामीण)अकोला- अकोला (शहर)पुसद- शेंबाळ पिंपरीउमरखेड- ढाणकीसिंदखेड राजा- साखरखेडामेहकर- डोणगावखामगाव- लाखनवाडावाशीम- अनसिंगरिसोड- केनवडकारंजा- कामरगावनागपूर (ग्रामीण)- बुटीबोरी आणि हुडकेश्वरहिंगणा- वानाडोंगरीनागपूर- नागपूर (शहर)कामाठी- वडोदासावनेर- खापरखेडाकाटोला- कोंढाळीनरखेड- जलालखेडामौदा- कोदांमेढीकुही- वेलतूरहिंगणघाट- अल्लीपूरसेलू- सिंदीपवनी- अड्याळचार्मेाशी- आष्टीकुरखेडा- मालेवाडाआरमोरी- वैरागडधानोरा- पेंढारीसिंरोचा- आसरअल्लीएटापल्ली- कसनसूरअहेरी- जिमलगट्टा
Web Summary : Maharashtra government approves 11 new Additional District Collectors and 69 additional Tehsil offices across six divisions. Pune gets three, others one each. This aims to reduce administrative burden and improve public access, considering population, geography, and remote areas. Baramati and Chakan are among the chosen locations.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने छह संभागों में 11 नए अतिरिक्त जिला कलेक्टरों और 69 अतिरिक्त तहसील कार्यालयों को मंजूरी दी। पुणे को तीन, अन्य को एक-एक मिलेंगे। इसका उद्देश्य प्रशासनिक बोझ को कम करना और जनसंख्या, भूगोल और दूरदराज के क्षेत्रों को ध्यान में रखते हुए सार्वजनिक पहुंच में सुधार करना है। बारामती और चाकण चुने गए स्थानों में से हैं।