शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Heavy Rain: सिंहगड रोड परिसरात बचाव कार्यासाठी लष्कराचे १०० जवान मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 15:38 IST

पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याने खबरदारीसाठी जवान तैनात

पुणे : पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. संपूर्ण शहरात पावसाने धुमाकूळ घातलाय. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्करी जवान सिंहगड रोड भागात दाखल झाले आहेत. 

आज पहाटे सुद्धा याच प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण  झाली होती. त्यामुळे लोकांचे संसार रस्त्यावर आले होते. अनेक भागात तर नागरिक अडकले होते. प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्यात आली. आता पुन्हा सायंकाळी अशी पुरासारखी स्थिती निर्मण होऊ नये यासाठी २४ मराठा बटालियन औंध चे 100 जवान सिंहगड रोडला दाखल झाले आहेत. 

एकतानगरी, निंबजनगरी तसेच आनंदनगर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यात रुग्णांचीही विशेष काळजी घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे. अशा परिस्थितीत काही नागरिक घरातून बाहेर येण्यास तयार नाही. आता ४ वाजता पुन्हा खडकवासला इथून विसर्ग होणार आहे. त्या अनुषंगाने नियोजनास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्करी जवानांना मदतीसाठी सूचना केली होती. त्यानुसार आता सिंहगड रोड परिसरात जवान दाखल झाले आहेत.      

भारतीय सशस्त्र दले पूर्ण तयारीत सुसज्ज 

लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील, असे भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडतर्फे सांगण्यात आले आहे. दक्षिण कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले पूर्ण तयारीत आणि सुसज्ज असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसForceफोर्सRainपाऊसenvironmentपर्यावरणSocialसामाजिक