संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:25 IST2022-02-03T10:24:55+5:302022-02-03T10:25:04+5:30

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

10 year old girl raped by rickshaw driver in pune | संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीला पत्ते खेळण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रिक्षाचालक आहे. त्याची पत्नी सोडून गेली आहे. आरोपी आणि त्याची आई असे दोघेजण एकत्र राहतात. तर पीडित मुलगी ही आरोपीच्या घराजवळच राहते. बुधवारी पीडित मुलगी ही घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला पत्ते खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावले आणि तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. काही वेळानंतर ही मुलगी घरी गेली आणि तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीची आई आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता तो पळून गेला. 

दरम्यान या सर्व प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Web Title: 10 year old girl raped by rickshaw driver in pune